सेवक सह्याद्रीचे
इतिहासातून प्रेरणा घेऊन, वर्तमानात काहीतरी करण्याचा प्रवास.
Sevak Sahyadriche
श्रेयश अस्मिता समिंद्र पाटील
सह्याद्री केवळ पाहायचा नाही,
तो जपायचा आहे.
सह्याद्रीच्या कुशीत उभे असलेले गडकिल्ले हा केवळ दगड-मातीचा वारसा नाही; तो आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा जिवंत ठेवा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, त्यासाठी झटलेले मावळे आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली ही समृद्ध परंपरा.
हा वारसा केवळ अभिमानाने सांगण्यासाठी नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन वर्तमानात काहीतरी करण्यासाठी आहे. महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी काहीतरी करावे, ही इच्छा शालेय जीवनापासूनच मनात होती. मात्र त्यासाठी मोठे होण्याचीच वाट का पाहायची? आपण विद्यार्थी असतानाच, कॉलेजमध्ये असतानाच आपल्या परीने काहीतरी करू शकत नाही का? या विचारातूनच एका छोट्या प्रयत्नाला सुरुवात झाली.
आपण विद्यार्थी असतानाच, कॉलेजमध्ये असतानाच आपल्या परीने काहीतरी करू शकत नाही का?
”सात मावळे.
एक विचार.
एक सुरुवात.
या विचारातूनच एका छोट्या प्रयत्नाला सुरुवात झाली. ३ जून २०२४ रोजी सात मावळ्यांना सोबत घेऊन ‘सेवक सह्याद्रीचे’ या प्रवासाची सुरुवात झाली.
एका मोहिमेपासून
अनेक उपक्रमांपर्यंत
गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेपासून सुरू झालेल्या या छोट्याशा प्रयत्नाला हळूहळू समाजाचा आणि युवकांचा प्रतिसाद मिळू लागला.
प्रत्येक मोहिमेसोबत नवीन माणसे जोडली गेली, नवीन विचार समोर आले आणि कार्याची व्याप्तीही वाढत गेली.
केवळ गड स्वच्छ करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांपर्यंत पोहोचला.
गडकिल्ले केवळ पर्यटनस्थळे नाहीत,
इतिहासाची जिवंत स्मारके आहेत.
स्वच्छता ही केवळ एक मोहीम नाही तर सामाजिक जबाबदारी आहे; आणि इतिहास हा केवळ भूतकाळ नाही, तर वर्तमान घडवण्याची प्रेरणा आहे.
या विचारातून Sevak Sahyadricheच्या कार्याची दिशा अधिक व्यापक होत गेली.
इतिहासातून प्रेरणा,
वर्तमानात कृती.
आमच्यासाठी इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाचा अभ्यास नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून नेतृत्व, शिस्त, नियोजन, व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जाण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा घेऊन ती आजच्या जीवनात प्रत्यक्ष उतरवणे, हा आमच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.
७ मावळ्यांपासून
७०००+ मावळ्यांपर्यंत
एका छोट्या गडकिल्ले मोहिमेपासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक युवकांना आणि सह्याद्रीप्रेमींना जोडत आहे.
एक विचार.
हजारो मावळे.
हा प्रवास एका व्यक्तीचा नाही. हा प्रवास आहे प्रत्येक त्या मावळ्याचा, ज्याने सह्याद्रीसाठी आपला वेळ, श्रम आणि प्रेम दिले.
सह्याद्रीसाठी
तुम्हीही आमच्यासोबत या.
तुमचा सहभाग छोटा असो वा मोठा, प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. चला, इतिहासातून प्रेरणा घेऊया आणि वर्तमानात काहीतरी चांगलं घडवूया.
प्रत्येक मोहिमेतून एक आठवण.
प्रत्येक सहभागातून एक सेवक.
प्रत्येक मोहिमेतून एक इतिहासाची आठवण, प्रत्येक स्वच्छता उपक्रमातून एक सामाजिक जबाबदारी, प्रत्येक प्रबोधनातून एक विचार आणि प्रत्येक सहभागीमधून एक ‘सेवक’ घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पुढेही हा प्रवास असाच सुरू ठेवायचा आहे! आपल्या क्षमतेनुसार काहीतरी चांगलं करत राहायचं, अधिकाधिक युवकांना या विचाराशी जोडायचं आणि आपल्या इतिहासातून मिळणारी प्रेरणा वर्तमानात उतरवायची.
हीच Sevak Sahyadricheची वाटचाल!!