Sevak Sahyadriche
← Back to all events
मोहीम क्र. 13 : हरिश्चंद्रगड
Trek Difficult

मोहीम क्र. 13 : हरिश्चंद्रगड

📍 हरिश्चंद्रगड 📅 28 September 2025 ⏱ 1 Day

About this trek

जुलै महिन्यातील प्रचंड पावसात झालेल्या मोहिमेनंतर, आता थोडा पाऊस कमी होण्याची वाट आम्ही पाहत होतो. ऑगस्ट महिन्यात सण-समारंभ आणि सततच्या पावसामुळे मोहीम होऊ शकली नव्हती. त्यामुळे यावेळी ठरवलं की एक मोठी आणि संस्मरणीय मोहीम काढायचीच! या मोहिमेचं खास वैशिष्ट्य म्हणजे, मुंबई विभाग देखील आमच्यासोबत स्वतंत्र बसने सहभागी होणार होता. दिवस ठरला… नियोजन पूर्ण झालं… पण अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्यावर पुन्हा पावसाने जोर धरला! मोहीम रद्द करणं शक्य नव्हतं. त्यामुळे “काहीही झालं तरी मोहीम करायचीच!” असा निर्णय झाला. आणि पुन्हा एकदा रायरेश्वर-केंजळगडसारखीच परिस्थिती निर्माण झाली. या प्रचंड पावसात आमचे 112 मावळे एकाही क्षणी मागे हटले नाहीत! पावसामुळे स्वच्छतेच्या कामात अडथळे आले, तरीही शक्य तितकी स्वच्छता पार पडलीच. पण इतिहास, एकता आणि अनुभवांच्या धाग्यांनी आमची मोहीम घडवली.. प्रत्येक मावळा या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग होता. या 112 मावळ्यांशिवाय हा दिवस, ही मोहीम अशक्यच होती! आणि अशा प्रकारे, पुन्हा एकदा भर पावसातली ही मोहीम यशस्वी, दमदार आणि चिरकाल स्मरणात राहणारी ठरली!