Sevak Sahyadriche
← Back to all events
दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाला 🚩🪔
Cultural Event Easy

दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाला 🚩🪔

📍 छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, वढू बुद्रुक 📅 01 November 2026 ⏱ सायंकाळी ६:०० वाजता

About this cultural event

दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाला 🚩🪔 ज्यांच्या विचारांचा प्रकाश आजही आपल्याला दिशा देतो, ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केलं आणि ज्यांच्या त्यागामुळे आपल्या संस्कृतीचा स्वाभिमान जिवंत आहे… त्या स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी, या दिवाळीतील पहिला दिवा त्यांच्या समाधीस्थळी अर्पण करूया! 🙏🏻 🪔 दीपोत्सव | वढू बुद्रुक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दीपप्रज्वलन, पूजन आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यानाच्या माध्यमातून आपण हा दीपोत्सव साजरा करणार आहोत. हे समाधीस्थळ असल्याने संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तीत आणि पूर्ण श्रद्धेने पार पडेल. 🗓️ रविवार, १ नोव्हेंबर २०२६ 📍 छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, वढू बुद्रुक 🕕 सायंकाळी ६:०० वाजता