Sevak Sahyadriche
English | मराठी
← Back to all events
मोहीम क्र. 7 : किल्ले पन्हाळा
Trek Moderate

मोहीम क्र. 7 : किल्ले पन्हाळा

📍 किल्ले पन्हाळा 📅 09 November 2024 ⏱ 1 Day

About this trek

पुण्यात मोहीम क्र. 6 यशस्वी झाली होती आणि त्याच उत्साहात दिवाळीच्या सुट्यांमध्ये आम्ही गावाकडे कोल्हापुरात आलो. मनात एक विचार होताच “केवळ पुण्यात नाही तर आपल्या गावीही परिवर्तनाची ठिणगी पेटवायला हवी.” आम्ही ठरवलं यावेळी मोहीम पन्हाळा गडावर करायची. हा तोच गड जिथून शिवरायांनी पावनखिंडीच्या अद्वितीय पराक्रमात पन्हाळा सोडला होता आणि जिथं बांदल मावळ्यांनी अमर बलिदान दिलं. या मोहिमेत एक वेगळेपण होतं. यावेळी आम्ही फक्त मित्रच नव्हतो तर अनेक नव्या मावळ्यांना सोबत घेऊन आलो होतो. आणि हे मावळे कोणी वेगळे नव्हते तर ते कोल्हापूर परिसरातील युवक होते, जे आमच्या आवाहनानंतर स्वतःहून गडावर पोहोचले. स्वच्छता मोहीम तर झालीच पण यासोबतच आम्ही एक "गडभ्रमण माहिती सत्र" घेतलं. पन्हाळ्याचा इतिहास, त्याचं सैनिकी महत्त्व, शिवरायांच्या योजना हे थोडक्यात त्यांच्या समोर उलगडलं. अशा प्रकारे, ही मोहीम केवळ श्रमदान न राहता शिकवण देणारा अनुभव ठरली. दिवाळीच्या सुट्टीत गडावर, सूर्यप्रकाशात, इतिहासाच्या साक्षीने घडलेली ही मोहीम यशस्वी ठरली. मावळ्यांची संख्या कमी होती पण ऊर्जा प्रचंड होती.