Sevak Sahyadriche
English | मराठी
← Back to all events
मोहीम क्र. 8 : किल्ले तोरणा
Trek Moderate

मोहीम क्र. 8 : किल्ले तोरणा

📍 किल्ले तोरणा 📅 12 December 2024 ⏱ 1 Day

About this trek

तिकोनानंतर अनेक जण विचारत होते "पुन्हा कधी निघणार?" हाच उत्साह बघून आम्ही ठरवलं की आता पुन्हा नव्या जोशात किल्ले तोरणावर मोहीम काढायची. यावेळी काही जण परीक्षांमध्ये व्यस्त होते म्हणून तितकी मोठी संख्या नव्हती. पण गणितात मावळे कमी असले तरी जिद्द पूर्ण गुणांकाने भरलेली होती. तोरणा हा गड एक वेगळीच आव्हानं घेऊन आला. मोठा गड, वेळ मर्यादित आणि काही नवीन मावळेही पहिल्यांदाच सोबत होते. त्यांना सोबत घेऊन आम्ही गड चढलो… गडभ्रमंती केली… आणि मग एकत्रित श्रमदान! गडावर प्रत्येक गोष्ट अडचणीशिवाय पार पडली. आता आमच्याकडे नियोजनाचा अनुभव होता, जबाबदारी वाटून घेण्याची सवय होती आणि सर्वात महत्त्वाचं "हे केवळ मोहिमेपुरतं नसलं पाहिजे, हे आपलं कार्यच आहे!" ही भावना होती. दिवसभराच्या अनुभवातून हे लक्षात आलं की, गड मोठा असो वा छोटा एकत्र आलो, मनापासून केलं तर प्रत्येक मोहीम यशस्वीच ठरते.