Sevak Sahyadriche
English | मराठी
← Back to all events
मोहीम क्र. 11 : किल्ले राजगड
Trek Moderate

मोहीम क्र. 11 : किल्ले राजगड

📍 किल्ले राजगड 📅 08 April 2025 ⏱ 1 Day

About this trek

मार्च महिन्यात काही कारणास्तव मोहीम झाली नव्हती. त्यामुळे एप्रिलमध्ये ठरवलं की यावेळी एक मोठी, दमदार मोहीम करायचीच! उन्हाचा तडाखा होता पण योग्य नियोजनाने आणि जिद्दीने काम केलं तर कोणतंही आव्हान लहानच वाटतं. मोहिमेसाठी निवड झाली स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाची! नेहमीप्रमाणे सुरुवातीला एक बस करून फक्त 50 मावळे घेण्याचं ठरलं. पण ही संख्या पूर्ण होताच अनेक लोकांची विनंती येऊ लागली. शेवटी एक छोटी गाडी वाढवून एकूण 70 मावळे राजगड मोहिमेसाठी निघाले. सकाळी 11 नंतर ऊन प्रखर होतं, त्यामुळे सर्व काम 11 च्या आत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. किल्ला पुण्याजवळ असला तरी, पहाटेची सुरुवात गडावर व्हावी म्हणून आम्ही रात्रीच प्रस्थान केलं. पहाटेच्या थंड वाऱ्यांत चढाईला सुरुवात केली. पद्मावती मंदिरात पोहोचून सूर्योदयाच्या साक्षीने काकड आरती पार पडली. त्यानंतर मावळ्यांचे 5 ग्रुप केले आणि सर्वांनी स्वच्छतेसाठी गडाच्या वेगवेगळ्या भागात काम सुरू केलं. अवघ्या दीड-दोन तासांत 70 मावळ्यांनी संपूर्ण राजगड स्वच्छ करून टाकला! उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने स्वछता झाल्यावर मंदिरात बसून पोवाड्यांचा जल्लोष झाला, राजगडाचा इतिहास ऐकवला गेला, प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली आणि मावळ्यांचे अनुभवही शेअर झाले. या मोहिमेची खास गोष्ट म्हणजे... एकीकडे 10 वर्षांचा हर्षवर्धन, तर दुसरीकडे 65 वर्षांचे प्रशांत काका या दोघांचाही उत्साही सहभाग होता! अशा प्रकारे, लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग असलेली, कडक उन्हातली ही 70 मावळ्यांची राजगड मोहीमही यशस्वीरीत्या फत्ते झाली!