Sevak Sahyadriche
English | मराठी
← सर्व मोहिम
मोहिम 9 Trek

मोहीम क्र. 9 : राजधानी रायगड – नव्या वर्षाची दमदार सुरुवात

📍 राजधानी रायगड 📅 06 January 2025 ⏱ 1 Day
मोहिम माहिती

मोहिम तपशील

तिकोना आणि तोरणाच्या दांडग्या अनुभवांनी अजूनही उत्साह ओसंडून वाहत होता आणि त्याच वेळी इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात झाली होती. मग ठरलं “2025 ची सुरुवात तर थेट स्वराज्याच्या राजधानी रायगडावरूनच करायची!” नेहमीप्रमाणे यावेळीही खासगी बसचे नियोजन झाले पण रायगड लांब असल्याने आधल्या रात्रीच प्रस्थान करावं लागणार होतं. आणि यावेळी मोहिमेत तब्बल दोन विशेष गोष्टी घडणार होत्या! पहिली म्हणजे...आजवर आम्ही मोहिमांचे फोटो-व्हिडिओ स्वतःच काढायचो आणि पोस्ट करायचो. त्यातून आमचं काम जास्त लोकांपर्यंत पोहचत नव्हतं. पण यावेळी, अगदी अचानकच आमची ओळख झाली 200k फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध व्लॉगर @kay.rao.vlogs सोबत! यामुळे मोहिमेचं दस्तऐवजीकरण आणि पोहोच वेगळ्याच पातळीवर जाणार होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे...दोन अंध विद्यार्थी (एक मुलगा आणि एक मुलगी) यांनी आग्रहाने मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा उत्साह आणि जिद्द आमच्यासाठी खरोखर प्रेरणादायी होती. संपूर्ण नियोजन, जबाबदाऱ्या आणि तयारी पूर्ण करून आम्ही मोहिमेसाठी रवाना झालो. गडावर पोहोचल्यावर संपूर्ण गडभ्रमंती, शक्य तेवढी माहिती देणं, जगदीश्वर मंदिराच्या परिसरात जोशात पोवाडे गाणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडाची स्वच्छता! यासाठी 4-5 टीम्स तयार केल्या गेल्या आणि अवघ्या दीड तासांत तब्बल 45 बॅग्स कचरा गोळा करण्यात आला. हा सर्व कचरा खाली आणून योग्य ती सोय करण्यात आली. मोहिमेनंतर रायगडाच्या पायथ्याशी दररोज सेवा करणाऱ्या योगेश काका यांच्या घरी सर्व मावळ्यांना स्वादिष्ट जेवणाचा योग आला. आणि अशा दमदार पद्धतीने 2025 चं पहिलं पान इतिहासात नोंदवलं आणि ही मोहीमही फत्ते झाली!

किंमतBudget-Friendly
कालावधी1 Day
अवघडपणाModerate
एकूण जागा0
उपलब्ध जागा0
Activity Conducted

उपक्रम / Activity Conducted

ही मोहिम पूर्ण झाली आहे