Sevak Sahyadriche
← सर्व मोहिम
मोहिम 12 Trek

मोहीम क्र. 12 : किल्ले केंजळगड आणि रायरेश्वर

📍 किल्ले केंजळगड आणि रायरेश्वर 📅 27 July 2025 ⏱ 1 Day
मोहिम माहिती

मोहिम तपशील

मे महिन्यात मोहीम झाली नव्हती आणि जूनमध्ये वृक्षारोपणामुळे गड मोहिमेला जाता आलं नव्हतं. त्यामुळे जुलै महिन्यात ठरवलं होतं की काहीही झालं तरी मोठी मोहीम करायचीच! पण पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. तरीही पाऊस थोडा थांबताच "पुढच्या आठवड्यात दोन गड आहेत संपूर्ण माहिती उद्या देतो." असा अचानक ग्रुपवर मेसेज टाकला. यावेळी पक्कं ठरवलं होतं की कितीही लोकं झाली तरी फक्त 50 मावळ्यांनाच घेऊन जायचं. पण दुसऱ्या दिवशी मेसेजनंतर अवघ्या 14 तासांत 50 जागा फुल्ल! अखेर सर्वांच्या आग्रहास्तव दुसरी छोटी बस करावी लागलीचं. राजगडप्रमाणेच आम्ही पुन्हा रात्री निघालो. पुण्यातून निघालो तेव्हा पाऊस नव्हता पण रायरेश्वर जवळ येताच मुसळधार पावसाने अक्षरशः अडचणींचा पाऊसच केला! बसलाही बऱ्याच अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. वाटलं, “ही मोहीम तर अशक्यच ठरणार.” सर्व मावळे थंडीने कुडकुडत गाडीतच दोन तास विश्रांती घेऊन पुन्हा उत्साहाने मार्गस्थ झाले. पावसाचा मारा सुरू होता, तरी कुणी छत्री, कुणी रेनकोट तर कुणी थेट पावसात भिजतच किल्ले केंजळगड सर केला! आता वाटलं होतं की रायरेश्वरला एवढा त्रास होणार नाही. पण तिथला पाऊस तर आणखीनच प्रचंड! तरीही कुणी थांबणारं नव्हतं. सगळे मावळे ओल्या मातीच्या गंधासोबत आणि अपार जोशात चढत राहिले. या मोहिमेची खास गोष्ट म्हणजे राजगड मोहिमेला सोबत असलेले 10 वर्षांचा हर्षवर्धन आणि 65 वर्षांचे प्रशांत काका यावेळीही आमच्यासोबत होते. कारण "सेवक सह्याद्रीचे" आता त्यांच्यासाठी केवळ प्रतिष्ठान न राहता एक खरं कुटुंब झालं होतं. गडावर मुसळधार पावसामुळे मोठी स्वच्छता करता आली नाही. पण जेवण झाल्यानंतर काकांच्या घरी पोवाड्यांचा दणदणीत कार्यक्रम झाला. त्यासोबतच प्रश्नमंजुषा स्पर्धा, अभिवाचन आणि माहितीची देवाणघेवाण अशा अनेक उपक्रमांनी मोहिमेला एक वेगळीच रंगत आणली. अखेर पुन्हा त्याच जोशात सर्व मावळे सुखरूप पायथ्याशी परत आले. आणि अशा या प्रचंड पावसात, “काय होईल?” अशी शंका असतानाही, 70 मावळ्यांच्या एकजुटीने ही मोहीमही यशस्वीरीत्या फत्ते झाली! 🚩 ही मोहीम सर्वांच्या आयुष्यात कायमची स्मरणात राहील असा अमूल्य अनुभव देऊन गेली.

किंमतBudget-Friendly
कालावधी1 Day
अवघडपणाDifficult
एकूण जागा0
उपलब्ध जागा0
Activity Conducted

उपक्रम / Activity Conducted

ही मोहिम पूर्ण झाली आहे