Sevak Sahyadriche
English | मराठी
← सर्व मोहिम
मोहिम 10 Trek

मोहीम क्र. 10 : शिवजयंती विशेष – शिवस्फूर्ती मोहीम

📍 सिंहगड 📅 19 February 2025 ⏱ 1 Day
मोहिम माहिती

मोहिम तपशील

रायगड मोहिमेचं यश अपेक्षेपेक्षा खूप मोठं ठरलं. Vloggers च्या मदतीमुळे आमचं काम महाराष्ट्रातील विविध कोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचलं. नवीन मावळे, नवीन चेहरे आणि नव्या प्रेरणा आम्हाला सतत जोडल्या जात होत्या. फेब्रुवारी आला आणि त्यासोबत शिवजयंतीचा मंगल सोहळा! ठरलं! यावेळी एक वेगळी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय मोहीम करायची. नाव ठेवलं "शिवस्फूर्ती मोहीम". या मोहिमेसाठी निवडला सिंहगड! सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या अद्वितीय बलिदानाने कोंढण्याचा सिंहगड झाला तोच! पुण्याजवळ असल्याने जाणं सोपं पण अनुभव मात्र अविस्मरणीय. यावेळी फक्त ठराविक, जबाबदार मावळ्यांचाच सहभाग ठरवला. एक आठवडा सविस्तर नियोजन केल्यानंतर, 18 फेब्रुवारी च्या दुपारी आम्ही बसने सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गड चढून tent लावले आणि लगेचच सगळे मावळे रांगोळी काढण्यात रमले. कारण संध्याकाळी होणार होता भव्य दीपोत्सव! 19 फेब्रुवारी, बरोबर मध्यरात्री 12 वाजता, दीपोत्सवाने संपूर्ण गड उजळून निघाला. त्यासोबत पोवाड्यांचा झंकार, पखवाज-टाळांचा नाद आणि मावळ्यांचा जयजयकार! रात्री हा जल्लोष पूर्ण केल्यानंतर, सकाळी आम्ही स्वतः रचलेलं पथनाट्य सादर केलं. यानंतर व्याख्याने, नाष्टा आणि मग गडाची स्वच्छता. हा आमचा नेहमीचा पण अभिमानास्पद उपक्रम. दिवस संपता संपता सिंहगड कचऱ्याच्या एकाही तुकड्याशिवाय स्वच्छ झाला होता. आम्हाला ही खूप छान वाटलं. आणि अशा प्रकारे, काही ठिकाणी शिवजयंतीला डॉल्बीवर नाचणारे लोक असताना, "सेवक सह्याद्रीचे" मावळे मात्र गडावर दीपोत्सव, पोवाडे, पथनाट्य आणि स्वच्छतेतून एक वेगळीच आणि भारदस्त शिवजयंती साजरी करून पुण्यात परतले!

किंमतBudget-Friendly
कालावधी1 Day
अवघडपणाEasy
एकूण जागा0
उपलब्ध जागा0
Activity Conducted

उपक्रम / Activity Conducted

ही मोहिम पूर्ण झाली आहे